You are currently viewing श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचा २४ डिसेंबर रोजी वर्धापनदिन!  

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचा २४ डिसेंबर रोजी वर्धापनदिन!  

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचा २४ डिसेंबर रोजी वर्धापनदिन!

मालवण

श्री श्री १०८ महंत मठधीश प. पू . सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या

श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.)

संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट,

या मठाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा

२४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त सकाळी ८ : ०० वा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती वरती आणि पादुकांवर अभिषेक, सकाळी ९ : ०० वा. श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, सकाळी ९ : ३० वा. पालखी पूजन,

सकाळी १० : ०० वा. अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा, सकाळी ११ : ०० वा. महाआरती

सकाळी ११ : ३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन,

दुपारी १२ : ३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण, दुपारी १ : ०० वा. महाप्रसाद, सायं. ५ : ०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम सुस्वर भजने, सायं. ६ : १५ वा. दिंडी पथक देखावा जय हनुमान प्रासादिक दिंडी भजन मंडळ – मसुरे कावा,

रात्रौ. ९:०० श्री वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली,कुडाळ यांचा ‘अघोरीं विद्या’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा