*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री राम जय राम जय जय राम ।। जय श्री राम ।।
___________________________
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-१०९ वे
___________________________
श्री महाराजांच्या महासमाधीचे वृत्त कळले । भक्त सारे
शोकसागरात बुडाले । लोक मंदिराकडे धावत सुटले ।
दर्शन अखेरचे घेण्या ।। १ ।।
गावोगावी निरोप गेले । लगोलग लोक येऊ लागले ।
अश्रूंनी साऱ्यांचे डोळे वाहू लागले ।श्री महाराजांचे दर्शन घेता ।। २ ।।
दिवस सोमवारचा तसाच गेला । वार मंगळवार उजाडला ।
भाऊसाहेब केतकरांनी पुढाकार घेतला । निर्णय अंत्यसंस्काराचा घेतला ।। ३ ।।
शोभिवंत विमान केले । त्यात महाराजांना ठेवले । भक्तांनी
विमान उचलले । जय श्री राम घोषात गोंदवल्यात विमान
मिरवून आणले ।।४ ।।
दुपारचे तीन वाजले । चुलत बंधू श्रीहरीने सारे संस्कार केले।
मग शरीर चितेवर ठेविले । काही क्षणात भक्तांचे श्री महाराज अनंतात विलीन झाले ।। ५ ।।
हरिपंत, काही मंडळी प्रयगक्षेत्री गेले । नामाच्या गजरात
अस्थी-विसर्जन केले । भगवंत नामाची गोडी जे श्री महाराज
लावूनी गेले । त्यांचे भौतिक अस्तित्व संपुनी गेले ।।६ ।।
********
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
___________________________
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास ।।
___________________________-
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे-पुणे.
____________________________