You are currently viewing वरिष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025

वरिष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025

वरिष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025

 खुल्या राज्य निवड चाचणीसाठी उपस्थिती राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 वरीष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025 खुल्या राज्य निवड चाचणी  चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय गुलटेकडी पुणे येथे दि. 26 डिसेंबर 2024 सकाळी 8 वाजता  व्हॉलीबॉल खेळाच्या खेळाडूंना (पुरुष/ महिला) उक्त निवड चाचणीकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक, युवराज नाईक यांनी केले आहे.

  राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम  सुरळीत सुरु रहावे यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनव्दारा ॲडहॉक समितीची नियुक्त करण्यात आली आहे.

             ॲडहॉक कमिटी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याव्दारे दि. 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत जयपूर राजस्थान या ठिकाणी सन 2025 मधील वरीष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याची जबाबदारी आयोजन समितीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे निवड चाचणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

             या निवड चाचणी ठिकाण, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय गुलटेकडी पुणे, राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड चाचणी उपस्थिती पुरुष व महिला यांनी  दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता आणि निवड चाचणी कालावधी दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता असून या निवड चाचणी दरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वत: करायची आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा