अमित शहा यांच्या वक्तव्याचा कणकवलीत ठाकरे शिवसेनेने केला निषेध
कणकवली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढून महामानवाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ठाकरे शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या.. भाजपच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध… अशा घोषणा देत गृहमंत्री अमित शाहा यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, संजय कदम, शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत पालव, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, संजना कोलते, हेलन कांबळे, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, योगेश मुंज, प्रदीप सावंत, राजू राठोड, अजित काणेकर, तात्या निकम, बाबू केणी, जितेंद्र कांबळे, धनश्री मेस्त्री, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्यासह कार्यकर्ते सामील झाले होते.