सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या सभागृहात सावंतवाडी तालुका भंडारी समाज प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत २०२५ ते २०२८ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, हनुमंत पेडणेकर, सचिव दिलीप पेडणेकर, सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर, सदस्य राजेंद्र बिर्जे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर, दीपक नाईक, लवू कुडव, दीपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, देवता पेडणेकर, समता सुर्याजी, सुरेश राऊळ यांनी निवड करण्यात आली.