मालवण शहर मार्गांवर महसूल पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले
मालवण
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर मालवण महसूल पथकाने देऊळवाडा व कोळंब पूला नजीकच्या भागात शुक्रवारी सकाळी पकडले. डंपर मध्ये चार ब्रास वाळू असून दोन्ही डंपर पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालय येथे नेण्यात आले आहेत.
संबंधितांवर कारवाई प्रक्रिया सुरु असल्याचे नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांनी स्पष्ट केले. तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा करून त्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने महसूल प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कारवाई दरम्यान मालवण शहर देऊळवाडा व कोळंब पूल परिसरात महसूलच्या पथकाने धडक कारवाई मोहीम हाती घेत दोन डंपर पकडले. संबंधितांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. या दोन्ही डंपरमध्ये चार ब्रास वाळू आढळून आली आहे. दोन्ही डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आले आहेत. तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, मंडळ अधिकारी जंगले, ग्राम महसूल अधिकारी बी. एस. शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.