सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर…
सचिवपदी दिलीप पेडणेकर; मंडळाच्या वार्षिक बैठकीत एकमताने निवड…
सावंतवाडी
येथील तालुका भंडारी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून गुरूनाथ पेडणेकर, बाळा आकेरकर, देविदास आडारकर, हनुमंत पेडणेकर तर सचिव म्हणून दिलीप पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी हा एकमताने निर्णय घेण्यात आला.