*लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम आदर्शवत -डॉ.दिलीप घाडी*
*लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न*
*५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान*
कणकवली
लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील १९ वर्षे सातत्याने रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्यासोबत अनेकदा सामाजिक उपक्रम देखील या मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात. सेवाभावी ,सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ असुन लिंगेश्वर मंडळाचा आदर्श सर्व मंडळानी घ्यावा ,असे लिंगेश्वर मंडळाचे काम आदर्शवत आहे.असे गौरवोद्गार डॉ.दिलीप घाडी यांनी काढले.
ते हळवल परबवाडी येथे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते . यावेळी रक्तदान शिबीर
कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. दिलीप घाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा रुग्णालय रक्त संकलन विभागाचे डॉ संकेत शेटे, श्रीमती प्रांजली परब, नेहा परब, ऋतुजा हरमलकर, विजय निरूखेकर, नितीन गावकर, आरोग्य सेविका निधी राऊळ, आशा सेविका प्रियांका तावडे, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दिपेश परब, दामोदर परब, दिपक राऊळ, वामन परब, दशरथ परब, मंगेश गावडे, प्रशांत गावडे, सतीश गावडे, विकास गावडे, महेश परब, अनिकेत परब, रोहन राणे, शैलेश परब, अक्षय गावडे, यशवंत परब, विक्रांत परब, यश परब, अमोल केतकर, रोशन राणे, किरण परब, ऋषीं राऊळ, मनीष परब, ओंकार राणे, गणेश गावडे, अक्षय मोर्ये, प्रतीक परब, रोहित राणे, प्रथमेश राणे, आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.दिलीप घाडी म्हणाले की,लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ गेली १९ वर्षे सातत्याने रक्तदान शिबीर आयोजित करुन एक वेगळा आदर्श मंडळाने जोपासला आहे.रक्तदान हे जीवन दान आहे.अनेक गरजू रुग्णांचे जीव वाचविण्याचे पुण्याचं काम रक्तदान करुन रक्तदाते करत असतात.ते जपत असलेली सामाजिक बांधिलकी पुढील तरुणपिढी ला एक वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे.मंडळ राबवित असलेले सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे अध्यक्ष लवू परब यांनी आभार मानले.