You are currently viewing कुडाळ हॉटेल आरएसएन ते एसआरएम मार्गावरील धोकादायक विद्युत खांब तातडीने हटवावे

कुडाळ हॉटेल आरएसएन ते एसआरएम मार्गावरील धोकादायक विद्युत खांब तातडीने हटवावे

मंदार शिरसाट यांची मागणी; सा. बा. उपविभाग व महावितरण विभागाला निवेदन

कुडाळ :

कुडाळ शहरातील हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धोकादायक विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत. या विद्युत खाबांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धोकादायक विद्युत खांब तातडीने हटवावे, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती मंदार शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व महावितरण विभाग यांच्याकडे केली आहे.

श्री. शिरसाट यांनी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.मोहिते यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,शहरातील हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज महाविद्यालय दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या रस्त्यावरील धोकादायक विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत. या रस्त्यावरुन अवजड वाहने, शहरातील नागरिक , शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. त्यामुळे धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या विद्युत खांबांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर धोकादायक विद्युत खांब तात्काळ हटविण्यात यावेत, अशी मागणी श्री. शिरसाट यांनी केली आहे. तसेच विद्युत अभियंता श्री. वनमोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सदर धोकादायक विज खांब हटवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नगरपंचायत बांधकाम समिती सभापती उदय मांजरेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा