*६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा*
*मुंबई-२ केंद्रातून ‘मोक्ष’ प्रथम*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘मोक्ष’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच माणूस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा या संस्थेच्या ‘हायब्रीड’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक रमाकांत जाधव (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक-१९६० रोजी), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रदीप पाटील (नाटक-मोक्ष) द्वितीय पारितोषिक केतन दुधवडकर (नाटक- रेड अंब्रेला), रंगभूषा प्रथम पारितोषिक वासुदेव आंब्रे (नाटक- जगज्जेता), द्वितीय पारितोषिक उल्लेश खंदारे (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक महेंद्र कुरघोडे (नाटक- मोक्ष) व नेहा अष्टपुत्रे (नाटक- पूर्णविराम), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शिवानी पेडणेकर (नाटक- हायब्रीड), प्रेरणा खेडेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), तेजश्री दाभोळकर (नाटक- म्याडम), भारती परमार (नाटक- मोक्ष), प्रथमेश भाट (नाटक-मोक्ष), डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स), अक्षय भोसले (नाटक – शोकांतिकेची रात्र), निनाद चिटणीस (नाटक- साती साती पन्नास)
दि. ६ डिसेंबर, २०२४ ते १८ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संजय दखणे, श्री. संजय कुळकर्णी आणि श्रीमती अर्चना कुबेर यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*