फोंडाघाटात लक्झरी बस गटारात कलंडली
सुदैवाने जीवितहानी नाही; बस चालक दारूच्या नशेत
फोंडाघाट
कोल्हापूर च्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्र.AR01Q-7575 फोंडाघाट च्या घाटातील पुनम हॉटेल च्या पुढे आली असताना, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकाचा वाहनवरील ताबा सुटून लक्झरी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन गटारात कलांडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ही बस डाव्या बाजूला दरीच्या दिशेने गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान सदरचा अपघात सायंकाळी ४ वा. च्या सुमारास अपघात घडला.
दरम्यान अपघाताची घटना समजताच हायवे ट्राफिक पोलीस हेड कॉनस्टेबल मिठबावकर,पोलीस हवालदार चोडणकर, डिसोजा, पोलीस कॉनस्टेबल मुंबरकर, साबळे घटनास्थळी दाखल झाले.यावेळी लक्झरी बस चा चालक जितेंद्र नाथ वय ५४ रा.अजमेर राजस्थान याची ब्रेथ एनालायझर मशीन ने तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने त्याच्यावर दारूच्या नशेत बेदरकार पणे व वेगाने घाट रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सदर गाडी चालवील्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. व बसमधील दहा प्रवाशांना खाजगी वाहनानी पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले. तर वाहन चालक जितेंद्र नाथ वय ५४ रा.अजमेर राजस्थान याला आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात करण्यात येऊन चालकाला पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात ण्यात आला आहे.