स्वागताची जय्यत तयारी; प्रभाकर सावंत व मनिष दळवी यांची माहिती
सिंधुदूर्गनगरी:
कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिक यांच्यावतीने जिल्ह्यात त्यांचे भव्य दिव्य असं स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आलेलं आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली. या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचा एक नियोजन करण्यात आले आहे. आज पर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळालेले नव्हतं ते भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेशजी राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे त्यांचे स्वागत त्याच पद्धतीने झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेल आहे.
22 डिसेंबरला सकाळी सन्माननीय नेते आमदार नितेश राणे 9:30 वाजता खारेपाटण येथे दाखल झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात स्वागत होईल. तिथे उपस्थित मंडळी आणि त्या विभागातील त्या परिसरातले सर्वजण त्यांचे स्वागत करतील त्यानंतर 10:15 वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे थांबून स्वागत स्वीकारल्यानंतर फणसगाव वरून 11:15 वाजता पडेल येथे पोहोचतील. तिथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर 12 वाजता मंत्री नितेश राणे देवगडला येतील. तिथेही त्यांचे जंगी स्वागत होईल 12:45 वाजता तळेबाजारला स्वागत होईल. दुपारी 1:30 वाजता शिरगावला स्वागत होईल. दुपारी 1:45 मिनिटांनी नांदगाव वरून त्यानंतर 2:30 वाजता भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती ओरोस येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यलयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांच्या सत्कार होईल त्यानंतर 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये ते भेटी देतील. जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालक ही आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यातील एक संचालक राज्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद आहे. जिल्हा बँकेत त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बांद्याकडे रवाना होतील. 4 वाजता बांदा त्यानंतर 4.45 वाजता दोडामार्ग येथे भव्य दिव्य असं स्वागत होईल आणि मंत्री महोदय कणकवली येथे रवाना होतील. सायंकाळी 7 ते 9 च्या दरम्यान कणकवली मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत मंत्री महोदयांच्या नागरी सत्कार संपन्न होईल. भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोरची पटांगण हे स्थळ आहे त्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि काही इतर कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
दिनांक 22 रोजी च्या दौऱ्यात संपूर्ण जिल्ह्यातील भेटी अशक्य असल्याने पुन्हा 25 डिसेंबरला उर्वरित तालुक्यांमध्ये जाऊन ते भारतीय जनता पार्टी व नागरी सरकार स्वीकारतील. सगळेजण आमदार नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी आमची मंडळी आहेत. या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे ज्या त्या ठिकाणी आपापल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी 7 वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे. त्याला सुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान. नितेश राणे यांच्या रूपाने हा एक मंत्रीपदाचा बहुमान मिळालेला आहे. या आधी जिल्ह्यातील अनेक सुपुत्रांना मंत्रीपदाचा बहुमान मिळाला परंतु विनोद तावडे, आशिष शेलार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही मंडळी मुंबईचे आमदार म्हणून कार्यरत होते. इतिहासात पहिल्यांदाच या जिल्ह्यातून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार कॅबिनेट मंत्री पदी विराजमान झालेले आहेत त्यामुळे खूप मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार होईल.