You are currently viewing कॅबिनेट मंत्री नितेश राणेंची जावेद खतीब यांनी घेतली सदिच्छा भेट

कॅबिनेट मंत्री नितेश राणेंची जावेद खतीब यांनी घेतली सदिच्छा भेट

नागपूर :

भाजपा युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत अभिनंदन केले. यावेळी बांदा शहरातील विविध विकासकामांबाबत श्री खतीब यांनी मंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला.नितेश राणे यांना भाजापकडून कॅबिने

ट मंत्रिपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री खतीब हे मंत्री राणे यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नागपूर येथे जात त्यांनी श्री राणे यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी मंत्री राणे बांदा शहरातील विकासकामांबाबत त्यांनी पाठपुरावा केला. विकासकामांची निश्चितच पूर्तता करण्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिल्याचे श्री खतीब यांनी सांगितले. मंत्री राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री खतीब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा