You are currently viewing सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ मार्फत आधारभूत किंमत भात खरेदीचा शुभारंभ

सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ मार्फत आधारभूत किंमत भात खरेदीचा शुभारंभ

सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ मार्फत आधारभूत किंमत भात खरेदीचा शुभारंभ

सावंतवाडी

शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले आहे.

शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२४-२५ अंतर्गत भात खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे व व्हा.चेअरमन रघुनाथ रेडकर यांच्या शुभहस्ते संस्थेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत मळगांव येथे करण्यात आला.

सदर भात खरेदी करीता शासनाने प्रती क्विंटल २३०० रूपये एवढा दर जाहीर केला आहे. भात खरेदी ऑनलाईन असलेमुळे, ज्या शेतक-यांचे रजिस्ट्रेशन ३१डिसेंबर पूर्वी होणार आहे अशाच शेतक-यांनी केंद्रावर भात विक्रीस आणावयाचे आहे. भात खरेदीची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ पर्यत राहील. सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री मार्फत सावंतवाडी, मळगांव, मळेवाड, तळवडे, कोलगांव, मडूरा, डेगवे, इन्सूली व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तरी या योजनेचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे व संचालक श्री. गुरुनाथ पेडणेकर यांनी शासकिय योजनेबाबत शेतक-यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. श्री . पेडणेकर म्हणाले,
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. तुमच्यासाठी सरकारने लोकप्रिय योजना राबविल्या आहेत. त्यासाठी दक्ष राहावे.

शासकीय हमीभावाने भात खरेदी शुभारंभप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. अभिमन्यू लोंढे, श्री. विनायक राऊळ श्री. आत्माराम गावडे, श्री. ज्ञानेश परब, श्री. दत्ताराम कोळमेकर, श्री. प्रमोद सावंत, श्री. नारायण हिराप, श्री. शशिकांत गावडे, श्री. दत्ताराम हरमलकर, श्री. प्रविण देसाई, संस्थेचे व्यवस्थापक श्री. महेश परब, ग्रामपंचायत सदस्य श्री. सावळ, संस्थेचे कर्मचारी व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी हेमंत राऊळ,एकनाथ मुळीक,सुनील नाईक, मारुती गावडे,महेश नाईक,अनिल मयेकर, नंदा सावळ,एकनाथ लातये, जनार्दन सावळ,कृष्णा राऊळ,तुकाराम कोरगावकर, रघुनाथ नाईक, सुभाष कुडव, औदुंबर सावंत, धर्माजी गावडे, प्रमिला राऊळ, मंजिरी सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा