You are currently viewing कोकण संस्थेची निराधारांसाठी ब्लँकेट वितरण मोहीम

कोकण संस्थेची निराधारांसाठी ब्लँकेट वितरण मोहीम

कोकण संस्थेची निराधारांसाठी ब्लँकेट वितरण मोहीम

कडाक्याच्या थंडीपासून दिलासा

मुंबई

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर राहणाऱ्या शेकडो गरीब व निराधार लोकांसाठी ब्लँकेट वितरण केले. सदर उपक्रम बांद्रा, माहीम, माटुंगा, दादर, वडाळा आणि स्वारगेट, पुणे येथे तसेच वलसाड, गुजरात आणि इंदोर, मध्यप्रदेश येथील रेल्वे स्थानके, बस स्थानके, फूटपाथ आणि झोपडपट्टी आणि आश्रमात अशा वेगवेगळ्या भागात ४५० हून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

 

थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे रस्त्याच्या कडेला झोपड्या बांधून राहणाऱ्या तसेच निवारा नसलेल्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलातील होणाऱ्या आजारांशी ही मंडळी झुंज़त असतानाच आलेल्या थंडीच्या या कडाक्यामुळे अनेक जण गारठून मरणाच्या बातम्या आपण ऐकतो. अनेक जणांना ताप, सर्दी, खोकला आणि हायपोथर्मियासारखे आजार पसरून अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होताना दिसतोय. अशा परिस्थितीत त्यांना थंडीपासून दिलासा मिळावा आणि जीव वाचावे, यासाठी ब्लॅंकेट वितरण करण्यात आल्याचे संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.

 

 

बिना पांघरून झोपत असलेल्या अनेक व्यक्तींना शोधून त्यांना हळूच ब्लँकेट पांघरताना गरजूंना शारीरिक उबच नाही तर मानसिक आधार देण्याचा आणि त्यांचे जीवन थोडं सुसह्य करण्याचा प्रयत्न कोकण संस्थेने केले. प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा मिळाव्यात, हीच बांधिलकी जपण्याचे काम कोकण संस्था करत असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केल्यास अशा उपक्रमांना अधिक बळ मिळेल. प्रत्येकाने मदतीसाठी उचललेले छोटेसे पाऊलही मोठा बदल घडवू शकते असे संस्था व्यवस्थापक सुरज कदम यांनी सांगितले.

 

या उपक्रमात संस्थेचे व्यवस्थापक सुरज कदम, प्रीती पांगे, साक्षी पोटे, शुभम देसाई, अभिजीत रेडेकर, विरल साळवी, सुनीता मर्चंडे, आशा तांबे यांचे सहकार्य लाभले.


प्रतिक्रिया व्यक्त करा