सावंतवाडी
आज गर्भवती असणारी स्री उद्या ज्या बाळाला जन्म देणार आहे. ती स्री शरीराने आणि मनाने सशक्त असणे गरजेचे आहे. कारण गर्भावस्थेत स्री आपल्या मुलाचे खरे पोषण करीत असते. त्याच्यावर संस्कार करीत असते. उद्याचा/ची एक सुजाण नागरिक घडवित असते. यासाठी गर्भारपणात अशा स्रीयांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. असे विचार रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी आज रोटरीच्या गर्भवती माता आणि मुलांचे आरोग्य या विषयावर आपले विचार मांडले.
रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने दर महिन्याला गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी तपासणी रो.डॉ.राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटलमध्ये केली जाते. आवश्यकते नुसार मोफत टॉनिक- गोळ्या दिली जातात. आजही या गर्भवती स्रीयाना रक्त वाढीच्या गोळ्या उप-जिल्हा रुग्णालयाचे डॉ.गिरीश चौगुले याच्या हस्ते देण्यात आली. आणि या अवस्थेत घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक गोष्टचे मार्गदर्शन केले.
यावेळी भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या ५, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रच्या 1 तर निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रच्या 2 अशा 8 गर्भवती स्रीयांची मोफत तपासणी केली गेली. आरोग्य सेविका पिंकी धोंडीबा येडगे यानी या स्रीयाचे नेतृत्व केले. रोटरी सचिव रो. दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितांचे आभार मानले.