You are currently viewing 2024 वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

2024 वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

2024 वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

सावंतवाडी

डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेर महिना असल्याने या महिन्यांमध्ये धावपळ वाढते. महिन्याच्या अखेरचे दिवस मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केले जातात.
25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणात अपघात घडतात याचं कारण अति उत्साहात घाई गडबड व निष्कर्षीपणा.
जशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तशीच तुमच्या कुटुंबाला तुमची काळजी आहे याचं भान असणं फार गरजेचं आहे म्हणूनच स्वतःची काळजी घ्या वाहने शिस्तीत व काळजीपूर्वक जपून चालवा व आपलं जीवन सुरक्षित ठेवा अशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे.
तुम्हा सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आमचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवार आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा