*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माणसातला देव*
माणसातला देव
प्रत्यक्ष आपल्याला दिसतो
कृपा अनभवतो
ठायीठायी….
कुष्ठरोग्यांची सेवा
केली बाबांनी अहर्निश
मिळाले आशिष
आनंदवनी….
उकिरडा, रेल्वेस्थानकावर
टाकून दिलेल्या मुलांची
माय अनाथांची
सिंधुताई....
सामाजिक सुधारणा
लेखणी दिली हाती
ज्योती सावित्री
वंदनीय…..
किती सांगावेत
माणसात असणारे देव
भक्तीची ठेव
तीच…..
संत आपले
देव होते माणसात
बोध सन्मार्गात
चालण्याचा….
मूर्ती मंदिरात
देव रहात नाही
ह्रदयी पाही
कळवळ्यात….!!
०००००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार @✍️