*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उस्तादजी*
असा कसा
हरवला ताल
वाह उस्ताद
म्हणती सालोसाल….
मूक झाला
तो तबला
ताल त्याचा
तो संपला….
असे बहारदार
सुंदर वादन
कसे ऐकतील
सारे रसिकजन….
श्रोते मुकले
त्या मैफिलीला
उस्तादांच्या बोटातच
जादूभरी कला….
निसर्गदत्त वारसा
पिताजींचा लाभला
उपजत प्रतिभेने
उस्तादजींनी वाढवला….
संगीत विश्वातील
व्यक्तिमत्व खास
तेजस्वी, रूबाबदार
गेले लयास……
🙏🙏🙏🙏
सौ.स्वाती गोखले.
पुणे.