*ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न*
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज ओरोस शासकीय विश्रांतीगृह येथे संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मतदारांनी आपल्या पक्षाला मते दिली त्यांचा सन्मान राखणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्याने, पदाधिकाऱ्याने काम करून पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंदुत्व मुद्द्यावर शिवसेना पक्षाच्या बाबतीत विरोधकांनी केलेला अपप्रचार खोडून काढून शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार लोकांसमोर घेऊन जाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, जिल्हा संघटक श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अमरसेन सावंत,मंदार केणी,चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कन्हैया पारकर,प्रथमेश सावंत,मायकल डिसोजा,मिलिंद साटम, जयेश नर,मंगेश लोके,संजय गवस,यशवंत परब,बबन बोभाटे,सचिन सावंत,अतुल बंगे,संतोष शिरसाट,यतीन खोत,आनंद ठाकूर,अवधूत मालणकर,राजू राठोड,उत्तम लोके,मथुरा राऊळ,स्नेहा दळवी,विदेही गुडेकर,निनाक्षी मेथर यांसह शिवसेना कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.