महादेवाचे केरवडे गावासाठी सन २०१७/१८ मध्ये BSNL टॉवर मंजूर झालेला होता. मात्र या तीन वर्षांमध्ये फक्त टॉवरच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झालेले आहे. तसेच टॉवरच्या पुढील कामी लागणारे विद्युत जनरेटर, पाईप, वायर इत्यादी साहित्य गावात धूळ खात पडलेले आहे. याबाबत वारंवार भेटी घेऊन सुद्धा लक्ष घालण्यात आले नाही.
महादेवाचे केरवडे गावात कोणत्याही प्रकारची नेटवर्क सुविधा नाही. लँडलाइन सुविधासुद्धा अनियमित आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नेटवर्कबाबत गैरसोय निर्माण होत आहे. सध्या कोरोना काळामध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात नेटवर्क साठी जावे लागत आहे. त्यामुळे हा टॉवर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. २६ जानेवारीपूर्वी हा टॉवर कार्यान्वित न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिवसापासून केरवडे कार्यद नारूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर महादेवाचे केरवडे ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.