गंभीर नोंद घेऊन कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नागपूर :
कोकणातील मच्छीमारांचा प्रश्न हा एक जिव्हाळ्याचा व मोठा प्रश्न सध्या मच्छीमारांना भेडसावत आहे.या प्रश्नाबाबत कुडाळ- मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोकणात मच्छीमारांचा प्रश्न हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न मच्छिमार बांधवांना भेडसावत आहे. कर्नाटकातून आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या मल्टी ट्रॉलर्स मुळे स्थानिक मच्छिमारांना तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला आहे. परराज्यातील ट्रॉलर्सच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढविण्यासोबत मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर गंभीर दखल घेण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गंभीर प्रश्न मांडला असून त्याची दखल देत त्या ट्रॉलर्सवर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.