परभणी जिल्हयातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना करणा-या व देशद्रोही कृत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई होणे बाबत…
आर. पी.आय. (आठवले) सिंधुदुर्ग पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
सिंधुदुर्ग
गेल्या 9 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृती ची तोडफोड करून विटंबना करणे है देशद्रोही कृत्य असून असे कृत्य करणान्या समाजकंटकाविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
सदरच्या घटनेने आंबेडकरी जनतेच्या व संविधान प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, जिल्हयातील जनतेच्या भावना तिव्र झालेल्या आहेत, सदरच्या घटनेचा सर्व प्रथम आम्ही तिव्र शब्दात नोंदवितो.
संविधान हा आमचा प्राण आहे, संविधान ही आम्ही आमची अस्मिता समजतो, देशाचा कारभार ज्या संविधानाप्रमाणे चालतो, त्या संविधानाचा अवमान करणे हे देशद्रोही कृत्य आहे, असे कृत्य करणान्या व त्याच्यामागे असणाऱ्या सुत्रधाराचा शोध घेण्यात यावा, तसेच परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण करणे निषेधार्थ आहे, पोलिस कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. ही दुखद बाब आहे. संबंधीत पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आंदोलनकर्त्या जनतेची तात्काळ सूटका करण्यात यावी. आर. पी.आय. (आठवले) पक्षाच्यावतीने न्याय हक्कासाठी जिल्हयात लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आर. पी.आय. (आठवले) सिंधुदुर्ग पक्षाच्यावतीने सादर केला गेला.
यावेळी रमाकांत जाधव – महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, प्रकाश कांबळे -जिल्हा सरचिटणीस, सखाराम कदम (जिल्हा कार्याध्यक्ष), आनंद पेंडुरकर (जिल्हा कोषाध्याय), अँड एस के चेंदवणकर (जिल्हा संघटक); ज्योती जाधव (नगरसेविका, दोडामार्ग नगरपंचायत), जागृती सासोलकर (ग्रा.प.सदस्य) सासोली, सतिश कदम (कुडाळ तालुका अध्यक्ष), संतोष जाधव (सावंतवाडी तालुका अध्यक्ष), अरुण कदम (तालुका पदाधिकारी), सत्यवान पालयेकर (उपाध्यक्ष-दोडामार्ग) उपस्थित होते
______________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*