दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम
दोडामार्ग
दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मार्फत सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे या सह्यांच्या मोहीमेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये जो निकाल आला आहे तो सर्वसामान्य जनतेला पचनी पडत नाही आणि त्यामुळेच मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सह्यांच्या मोहीमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
ही सह्यांची मोहीम तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक,तालुका उपाध्यक्ष शिवदास मणेरकर,गजानन वाडकर,आनंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.