You are currently viewing नळ कनेक्शन जोडणीबाबत ‌‌मार्ग न ‌काढल्यास १जानेवारी २५ रोजी आमरण उपोषण करणार – अजित नाडकर्णी ‌यांनी दिला इशारा

नळ कनेक्शन जोडणीबाबत ‌‌मार्ग न ‌काढल्यास १जानेवारी २५ रोजी आमरण उपोषण करणार – अजित नाडकर्णी ‌यांनी दिला इशारा

नळ कनेक्शन जोडणीबाबत ‌‌मार्ग न ‌काढल्यास १जानेवारी २५ रोजी आमरण उपोषण करणार – अजित नाडकर्णी ‌यांनी दिला इशारा

फोंडाघाट

अर्जदार श्री. अजित राधाकृष्ण नाडकर्णी आपणांस निवेदन करतो की, हवेलीनगर येथे आमची शुभांजीत सृष्टी या ठिकाणी निवासी गृह प्रकल्प होत आहे. या ठिकाणी जवळजवळ 30 लोकांनी निवासासठी जागा खरेदी केल्या आहेत. आपल्या ग्रामपंचायती मार्फत पाणी पुरवठा मेन लाईनला व्हॉल ओपन केला जात नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पाईप लावण्याचे कामही अपुर्ण स्थीतीत आहे. आपल्या ठेकेदारांस पाठवून ते काम पुर्ण करावे.
या ठिकाणी निवासी राहणारे सर्वजन रहिवाशी नळ जोडणी कनेक्शन घेणार आहेत. दि. 1 जाने. 2025 पर्यत मार्ग न निघाल्यास आमरण उपोषण केले जाईल. त्यामुळे शांतता भंग झाल्यास आपण जबाबदार राहाल याची नोद घ्यावी. तसेच या आमरण उपोषणास पुढील सर्वांचा पाठिंबा राहिल. यांची नोंद घ्यावी. याबद्दल या अगोदरही नोटीस दिली आहे.

तरी कृपया वेळीच दक्षता घेऊन पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात यांवी ‌ अशा आशयाचे निवेदन अजित नाडकर्णी यांनी ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत फोंडाघाट. यांना दिला आहे. खालील सर्वांचा‌ सर्वांनी आमरण उपोषणास पाठिंबा दिला आहे.
श्री. सुर्यकांत तेली 2) श्री. बंदरकर 3) श्री. मडवी 4) सौ. कदम 5) श्री. अवी सापळे 6) श्री. वर्दम 7) श्री. पुजा नाडकर्णी 8) श्री. गोसावी 9) श्री. हरी चव्हाण 10 ) श्री. कागले 11) श्री. शेनवी 12) श्री. अजित नाडकर्णी

ग्रामपंचायत कार्यालयासमोर न्यायासाठी आमरण उपोषण ‌ करणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले. कोणतीही परवानगी न घेता माझ्या मालकीच्या जागेत जल मिशनची पाईप लाईन टाकण्यात आली.त्या ठिकाणी शुभांजीति सृष्टीचे ४० प्लाॅट आहेत.लाईन टाकुनही ४ महीने ही पाईप लाईन चालु करण्यात आलेली नाही,तरी यातुन मार्ग न निघाल्यास १ जानेवारी २०२५ रोजी आमरण उपोषण केले जाईल.सदरची कॉपी पालकमंत्री नितेशजी राणे यांनाही देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा