You are currently viewing “निष्ठेने केलेल्या दत्तभक्तीचे फळ मिळते”

“निष्ठेने केलेल्या दत्तभक्तीचे फळ मिळते”

सद्गुरु गुरूदास माऊली दत्तजयंती निमित्त मुलुंड गुरूस्थानी भक्तांना मार्गदर्शन

मुंबई :

सद्गभक्ती मार्गाने ईश्वराठिकाणी आपले मन ठेवून निष्ठेने केलेल्या दत्तभक्तीची प्रचिती येत असते, त्यासाठी मनापासून आवड असल्यास आठवण होतेच असे सद्गुरु गुरूदास माऊली यांनी गुरुचरित्र चौथ्या अध्यायाचे पारायण प्रसंगी सद्गुरु श्री राऊळ महाराज गुरुस्थान मुलुंड (पूर्व) येथे उपस्थित भक्तांना प्रबोधन करताना सुचित केले. उत्सवाचा प्रारंभ श्री सत्यनारायण पूजेने करण्यात आला. सत्यनारायण देवांचे महत्त्व पुरोहित अमोल माईणकर यांनी भक्तांना समजावून सांगितले. पूजेचा मान १सौ. सुप्रिया नितीन सारंग या दांपत्याला देण्यात आला होता. गुरूदास माऊली पुढे म्हणाल्या की, आजच्या अस्थिर स्थितीत नामस्मरण महत्त्वाचे असल्याचे  सांगताना ते गुरूचरित्राच्या अध्यायातून अधोरेखित होते असे नमूद केले. नित्य नैमित्तिक पूजा, महाआरती, महाप्रसाद, नामस्मरण त्यानंतर युवा भजनी बुवा दिनेश व नंदेश संगमेस्कर बंधूनी दत्तभक्तीपर गायन करून सुस्वर भजन सादर करून रसिकांची मने जिंकली. त्याला तबलावादक वसंत घडशी यांची साथसंगत लाभली. यावेळी दत्त जन्माचा पाळणा उपस्थित महिलांनी सादर केला. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे , नंदकुमार वैती, म्हाडा कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक, उद्योगपती सुनील आचरेकर आदींनी गुरूस्थानी येऊन दर्शन घेत  माऊली सलग ४१ वर्षे साजरा होत असलेल्या उत्सवाचे स्वरूप पाहता आम्हाला प्रसन्नात लाभते असे विशद केले. या उत्सवात मोठ्या संख्येने दत्तभक्त सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या उद्घघोषणाने वातावरणात भक्तीमय झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा