You are currently viewing आ. नितेश राणे घेणार मंत्रिपदाची शपथ,देवगडच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्रिपदाचा लाभ

आ. नितेश राणे घेणार मंत्रिपदाची शपथ,देवगडच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्रिपदाचा लाभ

आ. नितेश राणे घेणार मंत्रिपदाची शपथ,देवगडच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्रिपदाचा लाभ

देवगड

देवगड वैभववाडी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्री मंडळात समावेशित करण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला आहे आमदार नितेश राणे हे फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री होणार हे आता निश्चित झाले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे. तीनही पक्षांकडून अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र काही नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना मंत्रिपदासाठीचा फोन आल्याचे सांगितले आहे. भाजपाकडून नितेश राणे गिरीश महाजन, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ यांनी वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचे सांगितले. भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आल्याची चर्चा आहे. शिवसेनेला (शिंदे) १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र खरा आकडा शपथविधी सोहळ्यानंतरच कळू शकेल.

रविवारी सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनद्वारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आला आहे.

भाजपाकडून मंत्रिपदासाठी कुणाला फोन?
भाजपाचे नेते गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ आणि जयकुमार रावल यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांना फोन आल्याचे सांगितले आहे. तर इतर नेत्यांपैकी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गणेश नाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले आणि पंकज भोयर यांना मंत्रिपदासाठी केलेगेले आहे.

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे गुलदस्त्यात होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा