बांदा :
मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार १६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी देवीची पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर मध्यरात्री आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मडूरा श्री देवी माऊली देवस्थान उपसमिती व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.