You are currently viewing दत्तजयंती

दत्तजयंती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*दत्तजयंती*

************

*त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त*

 

भारतीय प्राचीन हिंदुधर्म संस्कृतीतील अध्यात्मिक परंपरेतील देवदेवतांच्या उत्सवातील भक्तीउत्सव प्रत्येक श्रद्धाळू व्यक्ती परमभक्तीने करत असते.. !!

 

ही भरतभूमी देवदेवतांची , ऋषीमुनींची , संतांची पुण्यपावनी भूमी असून इथे या भूमित देवदेवतांचे जन्म झाले आहेत हे आपल्या सर्वांनाच अनेक धार्मिक प्राचीन ग्रंथातुन , पौराणिक कथा , प्रवचने , कीर्तने , तसेच संतवाङ्म्यातूनही वाचावयास मिळते.

 

चैत्र महिन्यापासून अगदी 12 महिने फाल्गुन महिन्यापर्यंत आपण हे धार्मिक उत्सव साजरे करीत असतो. हो भारतीय हिंदूधर्माची प्राचीन अध्यात्मिक , संस्कारित परंपरा आहे. या भूमीत *देवाचे दशावतार* झाले आहेत त्या दशावतारी अवतारांची महती आख्यायिका वेगवेगळी आहे. जेंव्हा जेंव्हा पृथ्वीतलावर अराजके माजली तेंव्हा तेंव्हा जगतकल्याणासाठी साक्षात भगवंताने हे दशावतार घेतले आहेत आणि त्याबद्दलचा सर्वाँशक उहापोह सर्वच धार्मिक वाङ्मयातून झालेला आढळतो.

आणि त्या परमात्म्याच्या अगम्य अशा *ब्रह्मस्वरुपाची* जाणीव होते.

 

*आज मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमे दिवशी प्रदोष कालात भगवान दत्तात्र्ययाचा जन्म झाला म्हणून *दत्तजयंती* उत्सव सर्वत्र श्रद्धेने साजरा केला जातो.

 

भगवान दत्तात्रय हे *ब्रह्मा , विष्णू , महेश (शिवशंकर ) यांचा त्रिमूर्तीस्वरूप अस एकरूपात्मक अवतार आहे.*

 

त्रिमूर्तीरूप हे निर्मोही गुरुतत्व असून अंतर्मुख होऊन जनसामान्यांना अजाण अज्ञानाच्या दूषप्रवृत्तीतुन मुक्त करून सात्विक आनंदाच्या कृपाळु ईश्वराच्या रूपाने ज्याने पृथ्वीतलावर जन्म घेतला ते रूप म्हणजे *त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तराज गुरू*

असे म्हणता येईल.

 

*धार्मिक पुराणात गुरू दत्तात्रयांचा जन्म एका भारतीय आश्रमात वैदिक ऋषी अत्री की ज्यांना वेदामधील ऋग्वेदातील उच्य योगदान देणारे ऋषी संबोधले जाते आणी पतिव्रता साध्वी अनुसया यांच्या पोटी झालेला आहे असे सर्वश्रुत आहे.*

 

धार्मिक पुराणकथेनुसार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील माहूर येथे असलेल्या उंच शिखराजवळच जे रेणूकादेवीचे प्रसिद्ध स्थान तेथील एका शिखरावर श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्म झाला आहे असे मानले जाते.

 

पौराणिक कथेतून दत्तात्रयाची जन्मकथा म्हणजे अनुसयेच्या पावित्र्याची सत्त्वपरीक्षा भगवंताने घेतली आणि सती अनुसयेच्या सात्विक सामर्थ्यामुळे ब्रह्मा , विष्णु , महेश या त्रिमूर्ती देवतांना तिच्या उदरी *दत्तात्रय* म्हणून जन्म झाला आहे हे मानले जाते.

 

दत्त आणि अत्रेय मिळून दत्तात्रय हा शब्द झाला आहे. दत्त म्हणजे ब्रह्म म्हणजेच आत्मा की जिथे निर्गुण , निर्मोही तत्वाची ईश्वरीय अनुभूती आहे याची जाणीव होते आणी अनेक दत्तकथा मधून गुरुदेव दत्त म्हणजे अत्रीऋषी व सती माता अनुसया यांचा त्रिगुणात्मक शंख ,चक्र ,पदम त्रिशूल , कमंडलू , तीन शिरे , सहा हात असा भगवान विष्णूचाच अवतार आहे असे मानले गेले आहे.

या अवतारात ब्रह्मा , विष्णू , शिव ( महेश / शंकर ) या त्रिदेव (त्रिमूर्तीचा ) समावेश असल्यामुळे यांना सगुण रूपाचे साक्षात एकतत्व त्रिमूर्तीदत्त म्हणून ओळखले जाते. त्यांचे वास्तव्य देववृक्ष औदुंबराच्या तळी , जवळ धेनु म्हणजे गाय , श्वान यांच्या सोबत हे दत्तावराचे प्रमुख वैशिष्टय मानले गेले आहे . भूत , प्रेत , पिशाच्य किंवा कुठल्याही अनिष्ट गोष्टी दत्तगुरूंच्या वाऱ्यालाही उभी रहात नाहीत . तर नाथपरंपरेत त्यांना विष्णूचाच अवतार मानले असुन नाथांच्या आदिनाथ संप्रदायातील आदिगुरू म्हणजे गुरुचे सर्वोच्य योगस्वामी मानले जाते.

गुरुदेव दत्तात्रयाचे अनेक अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ , (कुरवपूर) नरसिंह सरस्वती ,( गाणगापूर ) अक्कलकोट स्वामी समर्थ ,(अक्कलकोट ) माणिकप्रभु महाराज , (हुमणाबाद ) गजानन महाराज ,(शेगाव ) शिर्डीचे साईबाबा , ( शिर्डी ) नरसोबाची वाडी , औदुंबर अशी अनेक ठिकाणे आहेत की जेथे भक्तांची दर्शनासाठी रांग असते.

 

दत्तगुरु हे नाथपंथीय असून सर्वोच्य निर्मोही , सात्त्विक , कृपाळु ईश्वरीय तत्वाचे कल्याणकारी स्वामी असून

भक्तांचे सर्वार्थांने रक्षण करतात ही श्रद्धा आहे.

त्यांनी आपल्या अध्यात्मिक साधनेत स्वतः 24 गुरू केले आहेत. त्यामध्ये मनुष्यासोबत विविध पशुपक्षी यांचाही सहभाग आहे.

*पृथ्वी , जल , वायू , अग्नी , आकाश , सुर्य , चंद्रमा , समुद्र , अजगर , कपोत , पतंग , मछली , हिरण , हत्ती , मधमाशी , कुरर पक्षी , कुमारी कन्या , सर्प , बालक , पिंगला वैश्या , धनुर्धर , मकडी , भृंग व कीटक असे 24 गुरू दत्तात्रयांनी केले आहेत. त्याआदर्शातून आपण मनुष्यप्राणी देखील जीवनाची यशस्वी सूत्रे आत्मसात करू शकतो.

गुरू दत्तात्रयांचे तत्वज्ञान स्वानुभवी , आत्मग्यान , आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक असून गुरुचरित्रातील एक एक ओवी म्हणजे एक प्रभावी सिद्धीमंत्र असून त्याच्या उच्याराने निर्माण होणारे ब्रह्मांडातील सारे कंप हे जीवमात्राला कल्याणकारी असून प्रभावी आहेत असा वैज्ञानिक निष्कर्षही आहे. असे थिऑसॉफिकल रिसर्च सोसायटिच्या अध्यक्षा अँनी बेझंट म्हणतात.

खरे तर हा गुरुदेव दत्तात्रयाच्या अगाध अध्यात्मिक पार्श्वभूमीचा अभ्यासाचा , संशोधनाचा विषय आहे.

गुरुदेव दत्तात्रयाच्या भक्तीस्तोत्रामध्ये.. *ओम नमो भगवते दत्तात्रयाय…. पासून सुरुवात करून….ओम नमो महासिद्धाय स्वाहा । “*

 

*असा एक पूर्ण मंत्र आहे. या सिध्द दत्तमाला मंत्राची आवर्तने करून अभिषेक करण्याची श्रद्ध्येय परंपरा दत्तसंप्रदायात आहे.*

 

सर्वच दत्तभक्तांना या दत्तमाला मंत्राची तसेच गुरूचरित्र पोथीचे यथासांग पारायण केल्यावर आपल्या सात्त्विक इच्छा सर्वार्थाने पूर्ण होवून जीवन कृतार्थ झाल्याची अनुभूती आली आहे.

*ओम द्राम दत्तात्रयाय नम:।।*

हाही प्रभावी मंत्र आहे. याचा जप केल्याने…*सर्व सिद्धी, यश , किर्ती , आयुष्य , आरोग्य धनसंपत्ती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.*

 

*।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।*

*।।गुरुदेव दत्त।।*

*इती लेखन सीमा*

🔯🕉️🔯

*वि.ग.सातपुते. (साहित्यिक )*

*पुणे ( महाराष्ट्र )*

📞 *( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा