सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. शमा देशपांडे देणार जानेवारीत राजीनामा….
डॉ. भुलतज्ञ तेजस्विनी विजय आवळे यांची आठवड्यातुन तीन दिवस नियुक्ती
*राजेंद्र मसुरकर यांच्या प्रयत्नांना यश*
*सावंतवाडी*
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ डॉक्टर शमा देशपांडे हे व्यक्तिगत अडचणीमुळे व कामाच्या ताणामुळे जानेवारी महिन्यामध्ये राजीनामा देणार आहेत*.
*यासाठी त्यांनी पूर्व नोटीस जिल्हा रुग्णालय येथे पाठवली आहे यामुळे आता नव्याने डॉक्टर भुलतज्ञ तेजस्विनी विजय आवळे यांची तीन दिवसासाठी आठवड्यातून सोमवार मंगळवार ,बुधवार नियुक्ती डॉक्टर दिलीप माने उपसंचालक कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार सिविल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी नियुक्ती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली आहे*.
*यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर सावंतवाडी यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर भूलतज्ञ शमा देशपांडे यांनी व्यक्तिगत अडचणी व कामाचा ताण रुग्णालयात होत असल्याने जिल्हा रुग्णालयाला राजीनामाचे पत्र दिले होते*.
*यामुळे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी उपसंचालक कोल्हापूर डॉक्टर दिलीप माने यांना निवेदन पाठवून व तशाप्रकारे मोबाईल वरती बोलणी करून लक्ष वेधले होते* .
*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले असून चांगली सेवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून मिळतच चालल्याने गेल्या सात महिन्यांमध्ये बाह्य रुग्ण पन्नास हजार हून अधिक योग्य तो औषध उपचार घेऊन जात असतात* .
*तसेच दरमहा 350 गरोदर महिलांची सरासरी प्रसूती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे होत असते. त्यामध्ये 150 हून अधिक शस्त्रक्रिया शिजरिंग गरोदर मातांच्या होत असतात*.
*त्या व्यतिरिक्त हर्निया अपेन्डिस व विविध प्रकारचे शस्त्रक्रिया जनरल सर्जन डॉक्टर करत असतात* .
*यामुळे दिवसेंदिवस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळत असल्याने कामाचं ताण डॉक्टरांवरती येत चालला आहे*.
*त्यामध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन भूल तज्ञ डॉक्टरांची गरज असल्याने या कामाच्या ताणामुळे व व्यक्तिगत अडचणीमुळे डॉक्टर भूलतज्ञ क्षमा देशपांडे यांनी राजीनामा सिविल सर्जन यांच्याकडे पाठवला आहे. ही अडचण पाहता जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांना निवेदन पाठवून व मोबाईल वरती बोलून सविस्तर माहिती दिली होती*.
*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जर गरोदर मातांच्या शस्त्रक्रिया थांबल्यास त्यांना नाईलाजाने खाजगी रुग्णालय किंवा कुडाळ येथे महिला बाल रुग्णालय शासकीय तसेच जिल्हा रुग्णालय येथे रुग्ण पाठवावे लागेल*.
*यामुळे असे रुग्ण पाठवताना गोरगरीब जनतेला रुग्णांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहे*.
*तशातच गरोदर माता प्रसूती करण्यासाठी कुडाळ किंवा जिल्हा रुग्णालयात असे रुग्ण गेल्यास रुग्णवाहिकेतच अनेकदा प्रसूती मातांच्या डिलिव्हरी झालेली आहे हे आपल्याला ज्ञात आहे. गरोदर मातांच्या प्रसूती होणे हे महिलांचा पुनर्जन्म आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईकांना मानसिक ताण तणावातून जावे लागणार आहे* .
*तशातच दोडामार्ग तालुका, वेंगुर्ला तालुका, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी तालुका तसेच कुडाळ, माणगाव खोऱ्यातील रुग्ण आंबोली, चौकुळ भागातून असे रुग्ण गरोदरपणात सावंतवाडी मध्ये उपजिल्हा रुग्णालयात येत असतात*.
*यामुळे कमीत कमी दोन भूलतज्ञ डॉक्टर सावंतवाडी मध्ये उपजिल्हा रुग्णालयात मिळाल्यास आज जी उत्तम रुग्ण सेवा चालली आहे त्याला व्यत्यय येणार नाही. यासाठी आपण योग्य तो सहानुभूतीपूर्वक विचार करून भुलतज्ञ डॉक्टर देण्याचे मसुरकर यांनी सांगितले होते*.
*त्यामुळे उपसंचालक कोल्हापूर डॉक्टर दिलीप माने यांनी तशा प्रकारची सूचना सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय डॉक्टर श्रीपाद पाटील यांना दिल्या होत्या*.
*यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने आठवड्यातून तीन दिवस डॉक्टर भूलतज्ञ तेजस्विनी विजय आवळे यांना नियुक्ती केली आहे*.
*लवकरच शासनामार्फत नव्याने भुलतज्ञ तसेच तज्ञ डॉक्टर व एमबीबीएस असे डॉक्टर शासनाकडून मिळणार आहेत*.
*तसेच एक वर्षासाठी बोंडेड दरमहा 80 हजार पगार डॉक्टरांना देऊन अशा नियुक्ती जिल्हा रुग्णालय ओरस सिव्हिल सर्जन यांच्याकडे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज केल्यास अशांना गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना असे आदेश जिल्हाधिकारी व सिविल सर्जन यांना शासनाकडून देण्यात आले होते*.
*महाराष्ट्र किंवा अन्य राज्यातील डॉक्टर आपले नातेवाईक किंवा मित्र संबंधातील असतील तशांना सुद्धा अर्ज केल्यास अशा प्रकारची नियुक्ती डॉक्टरांना मिळू शकेल. यासाठी सर्व पक्षातील कार्यकर्ते व सामाजिक बांधिलकीच्या व्यक्तींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे*.
*डॉक्टरांच्या उच्च शिक्षणा मुळे कमी पगारात असे डॉक्टर महाराष्ट्रामध्ये यायला मानसिकता नसते*.
*महाविद्यालय कॉलेजमध्ये प्रोफे सरांना दोन लाख 50 हजार दरमहा पगार शासनाकडून दिला जातो. व शासनाकडून परमनंट नियुक्ती असलेल्या डॉक्टरांना एक लाख वीस हजार तसेच इतर अलाउन्स 40,000 एकूण एक लाख साठ हजार असा पगार तज्ञ डॉक्टरांना दिला जातो* .
*यामुळे महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना ज्यावेळी शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारे करणार त्यांना भूलतज्ञ डॉक्टर व तज्ञ डॉक्टर जनरल सर्जन ,अस्थिरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ अशा प्रकारचे शस्त्रक्रिया करतेवेळी रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करताना इन्सेंटिव्ह पगारा व्यतिरिक्त मानधन दिला तर डॉक्टरांची मानसिकता शस्त्रक्रिया करण्यास वाढणार आहे व गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे*.
*तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षातील राजकीय ग्रामीण भागातील कार्यकर्ते तालुका व जिल्हा पातळीवरील नेते यांनी आमदार व खासदारांना जागृत करणे गरजेचे आहे. तसेच आमदार व खासदारांना शासनामार्फत मानधन दिले जाते दरमहा त्यातूनही सुद्धा डॉक्टरांना पगार दिला तर हा प्रश्न जिल्ह्यातील मार्गी लागू शकतो*
*गोरगरीब रुग्णांची दुःखे आर्थिक परिस्थितीमुळे खाजगीरित्या रुग्णालयात जाणे न परवडणारे असे असते*.
*यामुळे महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आपले रुग्णालय हे मंदिर समजून यदा कदाचित ईश्वर आपली परीक्षा घेत आहेत. यदा कदाचित रुग्णालयात ईश्वर हे कुठल्याही रूपाने रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येऊ शकतात*.
*यामुळे सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी रुग्णालय हे मंदिर समजून कुठल्या प्रकारे राजकारण न करता टिपा टिपणी गोरगरीब रुग्णांना सेवा कशी मिळेल हे पाहिले पाहिजे अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे*.
*2013 नोव्हेंबर पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात ही राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना आणली गेली*.
*त्यानंतर त्याचे नाव 2016 नंतर महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना आमचे सरकार बदलल्यानंतर करण्यात आले. आता जुलै 2024 दीड लाख प्रतिवर्षी यावरून पाच लाख रुपये प्रति वर्षी कुटुंबाला शस्त्रक्रिया शासनाने मोफत दिल्या आहेत. व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात*.
*तसेच महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय येथे गरोदर मातांची प्रसूती तसेच अपेन्डिस ,हर्निया गर्भपिशवी काढणे गॅंग रिंग , हृदयविकाराचा झटका पॅरालिसिस आल्यास स्टेबल करण्यासाठी ताप सर्दी खोकला दमा असे उपचार महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत होतात. उर्वरित शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना अंतर्गत 1356 प्रकारचे शस्त्रक्रिया मोफत दिल्या जातात*.
*यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालय 2000 असून यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय, अन्नपूर्णा आता नव्याने शासनाने निर्णय झाल्यामुळे पांढरे रंगाचे रेशनिंग कार्ड व आधार कार्ड घेऊन गेल्यास शस्त्रक्रिया औषधे जेवण व प्रवास खर्च रुग्णांना मोफत दिला जातो*.
*यासाठी टोल फ्री क्रमांक शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील माहिती हवी असल्यास* *आजाराप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यात रुग्णालय खाजगी मिळू शकतात यासाठी टोल फ्री क्रमांक* *18002332200 या नंबर वरती माहिती घेतल्यास प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आपल्या रुग्णाला उपचार करण्यासाठी व* *शस्त्रक्रिया करण्यासाठी मिळू शकतात*.
*नवीन नियमानुसार रेशनिंग कार्ड व आधार कार्ड फोटो व मोबाईल नंबर मध्ये इ सेवा केंद्रामध्ये किंवा शासकीय रुग्णालयात तपासून घेणे गरजेचे आहे त्यानंतर तपासल्याचे सर्टिफिकेट मिळू शकते*.
*तसेच न केल्यास शस्त्रक्रिया करताना अडचणीचा सामना करावा लागतो*.
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोने-चांदी दागिन्यांचे व्यापारी उभा बाजार सावंतवाडी*
*मो.९४२२४३५७६०*