You are currently viewing जिल्हास्तरीय बैंडमिंटन स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय बैंडमिंटन स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय बैंडमिंटन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी

स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी व मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ डिसेबर व २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे विविध गटातून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

१) शालेय गट सिंगल
सिंगल :
१२ वर्षाखालील
मुले व मुली, प्रवेश फी रु.५०, स्पर्धा दि. २४.१२.२४
१७ वर्षाखालील
मुले व मुली
प्रवेश फी रु.१००, स्पर्धा दि. २४.१२.२४
२) खुलागट सिंगल :
पुरूष – प्रवेश फी रु.३००, स्पर्धा दि. २८.१२.२४
महिला – प्रवेश फी रु.२००, स्पर्धा दि. २८.१२.२४

३) खुलागट दुहेरी :
पुरुष – प्रवेश फी रु.४००, स्पर्धा दि. २९.१२.२४
महिला – प्रवेश फी रु.३००, स्पर्धा दि. २९.१२.२४

४) प्रौढ पुरूष गट :
फक्त दुहेरी प्रवेश फी रु. ४००, स्पर्धा दि.२९.१२.२४
( वयोमर्यादा ५५ वर्ष वरील)

सर्व सहभागी खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धा जिमखाना येथील बॅडमिंटन हॉल मध्ये होतील. सहभागी खेळाडूंची नाव नोंदणी स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी या संस्थेच्या सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या शाखाकार्यालयाकडे करावयाची आहे. शालेय गटातील खेळाडूंनी दि. २१ डिसेंबर २०२४ पूर्वी प्रवेश फी भरणा करून वर नमुद ठीकाणी नाव नोंदणी करावयाची आहे. खुल्या व प्रौढ गटात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश फी भरणावरून वर नमुद ठीकाणी नाव नोंदणी २६ डिसेंबर २०२४ पूर्वी करावयाची आहे. प्रवेश फी भरल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी श्री. केतन आजगांवकर, सावंतवाडी, भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०५४८५१ यांना संपर्क करावा.

तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धामध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मा. अध्यक्ष रोटरी क्लब, सावंतवाडी, मा. अध्यक्ष स्नेह नागरी सहकारी पतसंस्था व मा. अध्यक्ष मॅर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा