कुडाळ :
कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेच्या विद्यार्थ्यानी चौरंगी यश प्राप्त केले आहे. माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती गटात द्वितीय क्रमांक कुमार हर्ष प्रसाद परब इयत्ता ११ वी विज्ञान माध्यमिक दिव्यांग विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक कुमार शुभम राजूदास राठोड १२ वी विज्ञान तसेच प्राथमिक दिव्यांग गटात कु. आर्या अनंत मयेकर इयत्त्ता ८ वी द्वितीय क्रमांक प्राथमिक वक्तृत्व स्पर्धेत कुमारी दिक्षा विलास भिके प्रथम क्रमांक सर्व यशस्वी विद्यार्थ्याना विज्ञान शिक्षक श्री आर जी कर्पे, श्री ओ व्ही लाड तसेच सर्व विज्ञान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन मान श्री आपासाहेब गावडे सचिव मान श्री नागेंद्र परब, मुख्या मान श्री संजय गावकर, सर्व संस्था संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.