कणकवली खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ
कणकवली :
कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी (महसुल) कणकवलीचे जगदिश कातकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिक्विंटल २३०० रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे.
या वेळी शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विठ्ठल दत्ताराम देसाई, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक गुरुप्रसाद वायंगणकर, प्रशांत सावंत, लिना परब, स्मिता पावसकर तसेच राजन परब, शेतकरी मनोहर राणे, महादेव सावंत, सदाशिव परब, व्यवस्थापक गणेश तावडे, सहा. व्यवस्थापक राजेंद्र सावंत व शेतकरी तसेच कर्मचारी उपस्थित होते.