You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न*

वैभववाडी

आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी अस्मिता उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीषा टक्के व श्रीम. जोत्स्ना पाटील (सी. एच. ओ.) यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता राखण्याचे महत्व,आहार आणि त्या संदर्भातील गैरसमज व समस्या दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने विद्यार्थिनीना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब वैभववाडीचे अध्यक्ष श्री.प्रशांत गुळेकर, सदस्य श्रीम. संजना रावराणे व श्रीम. स्नेहल खांबल, आरोग्य सेविका श्रीम. जांभवडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, अधीक्षक श्री. संजय रावराणे, महिला विकास कक्षाचे सर्व सदस्य व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. सी. काकडे तर आभार प्रदर्शन प्रा.एस.एस. पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा