You are currently viewing मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समुहाच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन पाखरू पाखरू*

 

प्रीत कळी फुलताना

मन होतेस पाखरू

मधुगंध चाखताना

कसं भ्रमरा आवरू….1

 

स्पर्शातले क्षण क्षण

मज वाटे हवे हवे

गुंतलेल्या अधरांचे

श्वास भासे नवे नवे…2

 

झिलमिल नभांगणी

तेज तारका रुंजती

उतरुनी कुंदवनी

ताटव्यात अंकुरती….३

 

अवखळ वाऱ्यासवे

चारी दिशांना वाहूदे

लाट तरंग वेचत

स्वप्न सागरी जाऊदे…४

 

हळूहळू मुग्ध कळी

जशी उमलत जाते

बंध पाकळ्या नाजूक

गंध खोलणारे नाते….५

 

जसं मिठीत उन्हाच्या

झळ सोसूनी गातात

इंद्रधनु सप्तरंगी

पूल बांधून जातात….६

 

 

सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा