You are currently viewing निश्चिंत

निश्चिंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🍇🍇निश्चिंत🍇🍇*

 

ओठांनी नाही बोलली तरी चालेल गं……

डोळ्यांनी बोल

शब्दगंधापेक्षा तरळणार्‍या भावनांची किंमत जास्त असते !!!!

 

डोळ्यांनी नाही पाहिलं तरी चालेल गं……

हृदयातून पहा

तरळणार्‍या भावनांपेक्षा ओथंबणार्‍या भावांची किंमत जास्त असते !!!!!

 

हृदयातून नाही पहाता आलं तरी चालेल गं……

श्वासांनी समज

ओथंबणार्‍या भावांपेक्षा भरुन येणार्‍या उराची किंमत जास्त असते !!!!

 

श्वासांनी नाही समजता आलं तरी चालेल गं…….

मनाने मोज

भरुन येणार्‍या उरापेक्षा चंचल मनाच्या स्थैर्याची गोडी अवीटच असते!!!!

 

अजून काय सांगू ?

जेंव्हा सगळ्या भिंती तोडून एकमेकांच्या बाहूंचा हार एकमेकांच्या गळ्यात पडतो ना……

तेंव्हा नजरा झुकलेल्या असतात

ललाटपटलांवरचं वर्तमान एकमेकांवर आदळलेलं असतं

श्वासांची सरमिसळ थांबलेली असते

भरदार उरोजाच्या हालचाली थांबतांना तू मोजत असतेस भविष्यातील गांधाळलेल्या नशीबाचे अत्तर शिंतोडे

आणि

मी शांत असतो तुला दिलेल्या विश्वासाच्या श्रद्धेच्या आहेराकडे पहात… निश्चिंत !!!

 

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

नाशिक ९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा