पुणे :
सध्या पुण्यात फरग्यूसन कॉलेज मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव थाटात साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ” सावधन पुणेकर वाचत आहे ” हा उपक्रम आयोजित केला गेला होता. मैदानावर मोठ्या प्रमाणात जमून पुणेकरांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करायचे असे याचे स्वरूप होते. पण जे मैदानावर जमून एकत्रित वाचनात सहभागी होऊ शकत नाहीत त्यांनी घरी किंवा सोसायटीत हा उपक्रम रबवायचा होता.
त्याला प्रतिसाद म्हणून बावधन येथील पेबल्स टू सोसायटीतील नागरिकांनी हा उपक्रम आपल्या सोसायटीत अकरा डिसेंबर ला एकत्रित मोठ्या प्रमाणात रबवला. सोसायटीतील साहित्यिक श्रीनिवास गडकरी यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सोसायटीतील विस हून अधिक स्त्री, पुरुषांनी सहभाग घेतला. दुपारी बारा ते एक या वेळेत साऱ्यांनी मराठी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. यात सुनील कल्याणी, संजीव कुसूरकर प्रमोद गंगामवार, शिवाजी मोहोळ, सुरेंद्र साटम, स्नेहा अनगळ, अनिता जोगदंड, पानवटकर ई मंडळींनी सहभाग घेतला.
पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे व दर महिन्याला अशाच प्रकारे एकत्र येण्याचे ठरवून कार्यक्रमाची सांगता झाली.