सावंतवाडी:
रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोणापाल मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.