You are currently viewing फक्त तुझ्या गंधाने…..

फक्त तुझ्या गंधाने…..

बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम सौंदर्य वर्णन आज पर्यंत कोणी केले नसेल

🤣🤣😛😛❤️❤️😋😋

*फक्त तुझ्या गंधाने*
*मम मोह अनावर होतो*
*रसनेचा लगाम सुटतो*
*मी सहज ओढला जातो।*

*पाहुन पिवळी तव कांती*
*मी अति भुकेला होतो*
*हातात यायच्या आधी*
*नजरेने खाऊन घेतो।*

*मग पाव पांघरूनी वरती*
*लसणीची चटणी भरूनी*
*तळल्या मिरचीच्या संगे*
*मी तुजला उचलून घेतो।*

*प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा*
*किती विरोध झाला तरीही*
*हे प्रेम न माझे घटते*
*आस्वाद तुझा मी घेतो।*
*संग्रह # अजित नाडकर्णी,संवाद मिडीया✒️✒️✒️✒️✒️✒️*

प्रतिक्रिया व्यक्त करा