You are currently viewing अधुरे प्रेम

अधुरे प्रेम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अधुरे प्रेम*

(अष्टाक्षरी)

 

तुझं माझं प्रेम कधी

नचि कळे कुणालाही

क्षण साथ सोबतीचे

विसरती स्वतःलाही

 

गुज मनीचे तुझिया

कान ऐकण्या आतुर

मुके झाले शब्द तुझे

मन जाणिते चतुर

 

मन पाखरू पाखरू

जाणिलेच नाही कुणी

गुंतलेलं मन माझं

वेडं होई क्षणोक्षणी

 

अधुरेच प्रेमगाणे

ओठी रोज गुणगुणे

नयनांत दुःख तुझ्या

सारे दाटूनिया येणे

 

नको दुसरे काहीही

मनी होती एक आस

असे जोवरी जीवन

घ्यावा तुझ्यासाठी श्वास..

 

(दीपी)✒️

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा