You are currently viewing कुडाळात धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा

कुडाळात धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा

आमदार निलेश राणे यांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या धार्मिक स्थळावर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारी ध्वनी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनी प्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री 40 पर्यंत तर दिवसा आवाजाची मर्यादा 50 डेसिबल इतकी असावी. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री 45 तर दिवसा 55 डेसिबल पर्यंत असावी. वाणिज्य क्षेत्रात हीच मर्यादा रात्री 55 तर पाच दिवसा 65 डेसिबल पर्यंत आहे आणि औद्योगिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री 70 तर दिवसा 75 डेसिबल इतकी आहे असे असले तरी धार्मिक स्थळावर कायमस्वरूपी लावलेले भोंगे प्रत्यक्षात लावलेल्या ठिकाणी ही आवाजाची मर्यादा पाळत नाहीत. भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याचे अनुमती घेऊन वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे मात्र अजान देताना त्यांचे पालन होत नाही. तरी अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण या संदर्भात कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यांवर धडक कारवाई करावी असे आमदार निलेश राणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा