पणजी / प्रतिनिधी :
नागपूर येथील साहित्यविहार साहित्य संस्शेचा गझल पुरस्कार गोमंतकीय गझलकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना अलीकडेच प्रदान करण्यात आला. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार क्षीरसागर यांना देण्यात आला.
साहित्यविहार संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत श्री. क्षीरसागर यांच्या “हृदयात अंगार आहे” या गझल संग्रहाला गझलकारा आशा पांडे संचालित साहित्यविहार या संस्थेचा हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य विहार संस्थेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा अलिकडेच झाला. नागपूर येथील हिंदी मराठी साहित्यिक अनुवादक नेहा भांडारकर यांनी हा पुरस्कार आपल्यासोबत आणला होता. श्री. क्षीरसागर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या कार्यक्रमाला श्री. भांडारकर, डॉ. बिभिषण सातपुते, ज्येष्ठ कवयित्री मेघना कुरुंदवाडकर, आमोद कुलकर्णी, बबिता नार्वेकर, कविता आमोणकर, शर्मिला प्रभु, गोवा मराठी अकादमी आयोजित कविता स्पर्धेतील विजेते व सहभागी कवी, कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मडगाव येथे झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गोवा मराठी अकादमी व गोवा मराठी अकादमी सासष्टी विभाग यांच्या वतीने रवींद्र भवन मडगाव येथे भांडारकर यांच्या व्याख्यानाचा व मुलाखतीचा कार्यक्रम झाला.