You are currently viewing मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगावकर

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगावकर

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगावकर

कार्यवाह पदी महेश गावडे : कार्यकारिणीची बिनविरोध निवड

मालवण

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगावकर यांसह कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे येथे संपन्न झाली. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल नाजुकराव राणे, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग कार्यवाह तथा विभागीय कार्यवाह, कोल्हापूर विभाग गजानन नानचे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, शिक्षकेतर संघटना सिंधुदुर्ग उपाध्यक्षा तथा माध्यमामिक विद्यालय हिवाळे लिपिक धनश्री गावडे, जिल्हा संघटक निलेश पारकर, मालवण तालुकाध्यक्ष

शर्मिला गावकर, तालुका कार्यवाह रुपेश खोबरेकर आदी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शर्मिला गावकर यांनी केले. या सभेत सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी मालवण तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष पदी कैलास घाडीगांवकर (माध्य. विद्यालय, शिरवंडे) तालुका कार्यवाह पदी महेश गावडे (वडाचापाट) उपाध्यक्ष पदी घनश्याम राणे, उपाध्यक्ष सेवक कैलास कडू, सहसचिव अशोक वायंगणकर, खजिनदार शशिकांत परब, प्रसिद्धी प्रमुख गजानन मांजरेकर, हिशोब तपासणीस उदय चोडणेकर, संघटक दिनेश कदम, संघटक दयानंद पेडणेकर, जिल्हा प्रतिनिधी रुपेश खोबरेकर व शर्मिला गावकर, सदस्यपदी रेश्मा ढवण, नंदकिशोर तावडे, रविराज जाधव, संजय गोसावी, अनिरुद्ध आचरेकर, सुनेशा परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून निलेश पारकर (लिपीक, डी. एड्. कॉलेज, कणकवली तथा जिल्हा संघटक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग यांनी काम पाहिले. सभेवेळी ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे या संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे, सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी उपस्थित राहून, शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांनी यांना उपस्थितांना संघटनेविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यवाह गजानन नानचे यांनी मालवण तालुक्यातील शिक्षकेतर बांधवांना जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर येथे होणा-या राज्य अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहणे बाबत आवाहन केले.अनिल राणे व इतर जिल्हा पदाधिकारी वर्गाने नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार तालुका कार्यवाह रुपेश खोबरेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा