*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कारभारी*
झालं हिरव हिरव रान
सजनी सांगे साजनाला
गाडी घुंगराची चाले
खुळ खुळ घुंगरू गाडीला
झुणका भाकरी गाठोड
ठेवु झाडाच्या बुंध्याला
धाव्यावर मोट चाले
गाणं ढवळ्या पवळयाला
खाऊ झुणका भाकरी
एकमेका घास भरू
कसं लुकलुक बघतया
झाडावरचं पाखरु
उभ्या पिकाला पाणी
झुळू झुळु पाटातून
बारे देई कारभारी
अभंग वाणी गाण्यातून
ऊन वाऱ्यात राबुया
भरभर उरकु कामाला
दाणा भरता कणसाला
थांबवु या पाखराला
राग मल्हार छेडीला
मोर तालात नाचतो
ताल पिपाणी धरीते
वारा खट्याळ वाहतो
काडी काडी जमवुनी
सारा संसार थाटला
सारं शिवार सजल
आनंदाच्या या घडीला
*शीला पाटील. नाशिक*