*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आशिकी ….चहाची..!!*
अठ्ठावीसावी..!!
प्रेमांत पडावं तसं
चहाला शरण जातो
वाफाळलेल्या संकेताची धून
गळ्यांत उतरवून घेतो…
मुखीअमृताची सोबत नसलीजरी
मनांतचं चहाला …मी झेलतो
कोणतेही नखरे ..न करता
त्याच्या…आशिकीला शरण जातो
अद्वातद्वा बोलायला लागलो….जर
जीभेला चहाचा….चटका देतो
वाणीने दुखावलो गेलो….तर
चहांच्या..कपात स्वतःला बुडवतो..
दुःखात कोणीही कुणाची
सोबत करत नाही…अश्यावेळी
उजळं माथ्यानं फिरणं
चहाशिवाय जमतही नाही..
आगीतून फुफाट्यात जातांना
चहाशीचं काथ्याकूट करतो
शुध्द-अशुध्द काहीचं.. नसत
चहाचा घोटचं…कडवा पाठिंबा देतो..
साधसुधं रूपही …चहाचं
माझ्याकरता जीवघेणं ठरतं
स्पेशलंचहाच्या ..चुंबनाची जादू
आशिकीला घायाळ करतं..
बाबा ठाकूर