अमरावती दि.10 –
स्थानिक निरोग या संस्थेतर्फे येत्या 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये अमरावती येथे आरोग्य व अध्यात्म शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर स्थानिक अमरावतीच्या जवाहर गेटच्या आतील धनराज लेन या परिसरातील माहेश्वरी भवन येथे संपन्न होणार आहे.
आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त आहे. त्यावर मेरठ येथील इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिअलिजम या संस्थेचे मानस योग साधना हे सात दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबिरामध्ये निसर्गाच्या माध्यमातून आपणास आपलले आजार कसे दूर करता येतील यासंबंधी प्रात्यक्षिकासहित कृती करण्यात येतात. हे शिबीर केल्यामुळे आपले बरेचसे आजार दूर होऊ शकतात. विशेष म्हणजे निसर्गाच्या माध्यमातून हे कार्य केल्यामुळे याला कुठल्याही फारसा खर्च येत नाही. एक वेळ ही प्रणाली जर आत्मसात केली तर जीवन सुखी संपन्न व सफल होऊ शकते. त्यासाठी या आरोग्य व आध्यात्मिक शिबिराचे आयोजन केलेले आहे. या शिबिरासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या शिबीरार्थींची भोजन व निवासव्यवस्था तसेच स्थानिक लोकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये आरोग्याबरोबरच अध्यात्माचे धडे पण देण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे शिबिर अमरावती शहरात वर्षातून फक्त एकच वेळा होते. साधारणपणे दरवर्षी 350 लोक या शिबिरामध्ये सहभागी होत असतात.ज्यांना विविध प्रकारचे आजार आहेत ते या शिबिरात सहभागी झाल्यास त्यांना सात दिवसात बराचसा बदल झालेला दिसून येतो. अमरावती शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सत्यनारायण कासट यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. हे शिबीर आयोजित करण्यासाठी श्री माहेश्वरी पंचायतने सहकार्य केले असून जीवनाला स्वस्थ आणि सुखी करण्यासाठी नागरिकांनी आज आदर्श भोजन प्रणाली आत्मसात करण्यासाठी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन निरोग संस्थेचे सर्वश्री सुरेशचंद्र करवा (9422156715) ललित भाई सांगानी (9370135946) नंदकिशोर टी.राठी (9422155194) राधेश्याम भुतडा (9028102005) नंदकिशोर चांडक (9422888027) प्रा. जगदीश कलंत्री (9423126019) व विनोद खेतान (9420846448) यांनी केले आहे.
प्रकाशनार्थ.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक सदस्य निरोग संस्था.
अमरावती
9890967003

