You are currently viewing सत्यार्थ अव्यक्ताचे

सत्यार्थ अव्यक्ताचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी खालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सत्यार्थ अव्यक्ताचे*

******************

तूच लावण्य सुंदरा

प्रसन्नतम रूप तुझे

चेहरा तुझा सांगतो

मनातले सत्य तुझे

 

जाणतो मीही सारे

सत्यार्थ अव्यक्ताचे

मौनात जरी शांतता

क्षण कोणते सुखाचे

 

जगणे जरी पराधीन

शब्दातच सुख न्यारे

मनामनात रुजताना

आत्म सुखावते सारे

 

गंगौघ प्रीतभावनांचा

परमानंदा स्पर्शणारा

त्यातची डुंबता डुंबता

लाभो सौख्य किनारा

******************

*रचना: २००*

*#©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा