You are currently viewing बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ.दीपक केसरकर

बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ.दीपक केसरकर

सावंतवाडी :

बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील तो अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.

बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो.

यासर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे. त्यांना तात्काळ सोडावे तसेच बांगला देशात हिंदू अल्पसंख्याकांचा होणारा क्रूर छळ थांबावा या मागणीसाठी ओरोस येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय मुक यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या बांगलादेश मधील हिंदूंना आपला भक्कम पाठिंबा दाखवावा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा