You are currently viewing आनंदीबाई रावराणे स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

*आनंदीबाई रावराणे स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा.*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात
आनंदीबाई रावराणे यांचा ८ डिसेंबर रोजी ३० वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यामध्ये इतिहास विभागाच्यावतीने भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या माहिती भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले होते.
तसेच जिमखाना विभागाने शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहामध्ये कनिष्ठ महाविद्यलयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मुलांच्या गटातील विजेतेपद अनुक्रमे कणकवली महाविद्यालयातील जय किशोर पेडणेकर, अमन अशोक बागवान, आणि धनराज शंकर खोदलेकर यांनी पटकावले.
मुलींच्या गटात अनुक्रमे श्रेया श्रीकांत सामंत (डॉन बॉस्को, ओरोस), पूर्वा सुभाष पवार (आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालय), आणि श्रुती राजेश खानोलकर (कासार्डे कनिष्ठ महाविद्यालय) यांनी पटकावला.
या स्पर्धेत कै.हेमंत केशव रावराणे, वैभववाडी, कासार्डे, तळेरे, कणकवली, आचिर्णे आणि डॉन बॉस्को, ओरोस या कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सजनक्का रावराणे, विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे व जिमखाना प्रमुख श्री. एस. बी. पाटील उपस्थित होते. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गुळेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पंच म्हणून अशोक पाटील, किशोर पेडणेकर, संतोष पेडणेकर, अमोल येन्गे, आणि सर्वेश सोनम यांनी काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापदाधिकारी, प्र. प्राचार्य, जिमखाना विभाग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा