You are currently viewing मोती तलावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेले कृत्रिम पशु-प्राणी यांचे नगरपरिषदेने त्वरित नूतनीकरण करून पर्यटन वाढवावे – रवी जाधव

मोती तलावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेले कृत्रिम पशु-प्राणी यांचे नगरपरिषदेने त्वरित नूतनीकरण करून पर्यटन वाढवावे – रवी जाधव

मोती तलावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेले कृत्रिम पशु-प्राणी यांचे नगरपरिषदेने त्वरित नूतनीकरण करून पर्यटन वाढवावे – रवी जाधव

सावंतवाडी

मोती तलाव येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज स्टॅचूच्या बाजूला लागून असलेल्या नाल्यामध्ये नगर परिषदेच्या मार्फत काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या कृत्रिम पशु -प्राणी त्यामध्ये पटेरी वाघ, हरीण,सांभर व पांढरे बगळे पर्यटकांचे लक्ष वेधत होते तर तो परिसर एक पर्यटनाचा भाग बनला होता.
आजच्या घडीला त्या नाल्यामध्ये बसविलेले काही पशु-प्राणी नाहीसे झालेले दिसतात. सदर परिसराचा मेंटेनन्स ठेवण्याची पूर्ण जबाबदारी हि सावंतवाडी नगर परिषदेची होती परंतु त्यांच्या दुर्लक्षेतेमुळे सदर भाग ओसाड बनलेला आहे.
याबाबत सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच सावंतवाडी मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख ७१ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला असून सदर मंजूर निधीमधून काही रक्कम नाल्यातील कृत्रिम पशु-प्राणी यांचे नूतनीकरण करावं तसेच त्या ठिकाणच्या बॅरीगेटची उंची वाढवावी जेणेकरून पुन्हा कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये याची काळजी नगर परिषदेने घ्यावी आणि अशा पद्धतीने सदर परिसराचा विकास करून तो परिसर सुशोभित करावा व त्या ठिकाणचं पर्यटन वाढवावे असं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव ,ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमी यांच्याकडून नगरपरिषदेला आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा